सर्व गुरूंना...शिक्षकदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...

teachers day quotes in marathi


ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे..
 त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे..
 मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी..
 तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही..
  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
               खरंच या श्लोकपंक्ती तुम्हा सर्व गुरूंचे मोठेपण सांगण्याकरीता पुरेशा आणि समर्पक आहेत. शिक्षक म्हणजे परमेश्वराचा माणसाच्या रुपातला अंश असतो ,जसं कि जीवनात केव्हाही ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हावसं वाटतं ते म्हणजे आपलं जीवन आचारविचार आणि संस्कारांनी समृद्ध करणारे गुरू अर्थात शिक्षक...शिक्षकांचा सहवास म्हणजे जणू काही सद्गुरूंचा सहवास...गुरूविण दुजा नाही कुणी.... असा भाव मनी असतो.
          माझा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न आणि खूप मोठा व्हावा..त्याने खूप नाव कमवावं.. हा साधा सिद्धांत प्रमाण मानणारा गुरू हाच श्रेष्ठ गुरू असतो आणि तोच गुरू सगळ्यात यशस्वी देखील असतो...शिक्षकाचा जन्म सार्थकी लागल्याचे समाधान आत्मसात झालेला तसेच ज्ञानदानासाठी आग्रही आणि वेड्या असलेल्या गुरूंचा सहवास मिळायला देखील भाग्य लागतं... आणि तो भाग्यवान विद्यार्थी मी आहे...

             माझ्या जीवनातील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष...तसेच भावी पिढ्या घडविणारा शिल्पकार अर्थात माझे सर्व शिक्षक...या आणि अशा असंख्य गुरूंबद्दल कृतज्ञता आणि आदरभाव व्यक्त करून तो सदैव मनी जपण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन....
          आजच्या शिक्षकदिनाच्या पवित्र प्रसंगी जीवनात सावलीप्रमाणे माझ्यासमवेत असलेल्या प्रत्येक गुरूप्रती आणि ते करत असलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याप्रती नतमस्तक होऊन शिक्षकदिनाच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो...

Post a Comment

Previous Post Next Post