मराठा आरक्षण जात प्रमाणपत्र | ESBC CERTIFICATE
महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी शासन निर्णय क्रमांक : सीबीसी-१०/२०१३/प्र.क्र.३५/मावक अन्वये "शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (शै.सा.मा.प्र.) Educationally and Socially Backward Category (ESBC)" या नावाचा नवीन प्रवर्ग तयार केला आहे. या नियमांनुसार मराठा समाजास १६% आरक्षण देण्याचा आदेश पास झाला आहे. हे आरक्षण सर्व शिक्षणसाठी असणार आहे.
मराठा जात प्रमाणपत्रसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- तहसिलदार यांच्या सहीचा उत्पन्नाचा दाखला
- तहसिलदार यांच्या सहीचा जातीचा दाखला ( Caste Certificate )
- Non Creamy Layer सर्टिफिकेट
- जात वैधता प्रमाणपत्र
या कागद्पत्रांप्रमाणे खालील कागदपत्रे उपयोगी आहेत.
- १०वी , १२वी चा शाळा सोडलेला दाखला, बोर्ड सर्टिफिकेट
- जन्म दाखला
- रेशन कार्ड (शिधापत्रिका)
- तलाठी यांचा सहीचा रहिवासी दाखला
- ७\१२ उतारा
- मतदान पत्र
- PAN कार्ड ( पर्याय म्हणून )
- आधार कार्ड
वरील सर्व कागदपत्रे ही मराठा जात प्रमाणपत्र व ESBC सर्टिफिकेट साठी उपयोगी येतील.
तसेच या कागदपत्रांचा संच ( TRUE COPY ) सत्य प्रत करून ठेवावी.
सर्वस्वी याच कागदपत्रांचा आपणास कायम उपयोग होतो.


Post a Comment