लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित केले आहे.
- जिल्हयामध्ये जाणारे मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी खालील लिंकवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा. पुणे पोलीस आयुक्त व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त यांचे हद्दीतील अर्जावर संबंधित आयुक्तालयातील नोडल अधिकारी तथा पोलीस उपआयुक्त हे निर्णय घेतील. असानिर्णय घेताना मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी पोलीस उपआयुक्त, जिल्हाधिकारी, यांच्यामार्फत ते ज्या जिल्हयात अथवा राज्यात जाणार आहेत तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त करुन घेतील व त्यानंतरच पास देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
- महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार विस्थापित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्ती यांचे प्रवासाकरीता आदेश निगर्मित केले आहेत. या आदेशानुसार सदर व्यक्तींची प्रवास व्यवस्था व त्याचे नियोजन करण्यात आल्याची तसेच याकरीता नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, पुणे जिल्हयातील ग्रामीण क्षेत्रातील इतर जिल्हयात व इतर राज्यांमध्ये जाणा-या मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांची यादी संबंधित तहसिलदार करतील. व ते ज्या जिल्हयांमध्ये जाणार असतील तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी जिल्हाधिकारी, पुणे यांचेमार्फत घेतील.जोपर्यंत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांना ते ज्या जिल्हयात जाणार आहेत तेथील जिल्हाधिकारी यांची परवानगी प्राप्त झाल्याशिवाय त्यांना पास दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्ष्आहट केले.
- मजूर, विद्यार्थी, यात्रेकरु व अन्य व्यक्ती यांनी कोणत्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक यांचे कोरोना विषाणूचे कोणतेही लक्षणे नसल्याबाबतचे प्रमाणपत्र घेवून लिंकवर अपलोड करणे अनिवार्य आहे. नागरिकांना लिंकवर माहिती भरण्यामध्ये काही अडचणी असतील तर त्यांनी ग्रामीण भागासाठी दूरध्वनी अथवा ई मेल द्वारे संपर्क साधावा.
- याकरीता नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे (दूरध्वनी क्र. 020-26111061 / 26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार (परराज्यात, जिल्हयात जाणारे) , उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्र.3 श्रीमंत पाटोळे ( दूरध्वनी क्रमांक 020-26111061/26123371) यांच्याकडे स्थलांतरीत कामगार (परराज्यात, जिल्हयात येणारे) यात्रेकरु, पर्यटक ( परराज्यात / जिल्हयात येणारे ) यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी सांगितले आहे.
APPLY HERE वर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता
वरील सर्व माहितीही District Information office Pune यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून घेतले आहे
Please Help me I Am student leave in Pune .. no any famufa member leave with me ...my mom and dad . leave in village . I want to go village
ReplyDeletefollow the government rule. Fill the google form provided by District Information office Pune.
DeletePost a Comment